महाविध्वंसक भूकंपानंतरची २५ वर्षे, दगड-मातीचे ढिगारे अन् मृत्यूचे तांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 02:25 AM2018-09-30T02:25:12+5:302018-09-30T02:25:33+5:30

पुणे महापालिकेच्या पथकाचे उल्लेखनीय काम : चार दिवस दोन गावांत मदतकार्य

25 years after earthquake earthquake, rock-clay erosion and death mound | महाविध्वंसक भूकंपानंतरची २५ वर्षे, दगड-मातीचे ढिगारे अन् मृत्यूचे तांडव

महाविध्वंसक भूकंपानंतरची २५ वर्षे, दगड-मातीचे ढिगारे अन् मृत्यूचे तांडव

Next

पुणे : भूकंपाने सर्व घरे दगड-मातीचे ढीग बनले होते. रस्त्यांचे अस्तित्वही दिसत नव्हते. त्यातच पावसाची रिपरिप. ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत सापडण्याची शक्यताही धुसर होती. अशा कठीण परिस्थतीत पुणे महापालिकेच्या ४०० जणांच्या पथकाने राजेगाव आणि चिंचोली रेबे या दोन गावांमध्ये चार दिवस मदतकार्य केले. या पथकातील तत्कालीन नगरसेवक अंकुश काकडे व तत्कालीन सहायक आरोग्य प्रमुख डॉ. दिलीप परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना या घटनेच्या आठवणी जागविल्या.

लातूर भूकंपाला रविवारी (दि. ३०) २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या भूकंपानंतर मदतीसाठी अनेकांचा हात पुढे सरसावले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्वांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार पुणे महापालिकेचे काही नगरसेवक, आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांची चारशे जणांची टीम उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील राजेगाव व चिंचोली रेबे या गावांत चार दिवस तळ ठोकून होती. या गावातील ढिगारे उपसणे, मृतदेहांची विल्हेवाट लावणे, गरजूंना मदत करण्याचे काम या पथकावर होते. हे पथक दि. १ आॅक्टोबरला सायंकाळी आठ पीएमटी बस व तीन ट्रकसह पुण्यातून रवाना झाले. सोबत खाण्यापिण्याचा सर्व लवाजमा, आचारी होते. दुसºया दिवशी शनिवारी पहाटे या गावांमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच कामाला सुरूवातही झाली.

दगड मातीचे बांधकाम असलेली घरे पूर्णपणे जमीनदोस्त झालेली. तर सिमेंट काँक्रिटची घरे तग धरून उभी होती. अशाप्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचा कुणालाच अनुभव नव्हता. त्यामुळे सर्वांना कामाच्या जबाबदाºया वाटून देण्यात आल्या. त्यासाठी चार-पाच स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या.

पहिल्या दिवशी ढिगाºयाखालून ६ ते ७ मृतदेह बाहेर काढले. तसेच ८ ते १० जनावरेही काढण्यात आली. असा पहिलाच अनुभव असल्याने अनेकांच्या मनात भीती होती. पण मदतीच्या भावनेने सर्वांनी झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली. सकाळी उजाडल्या पासून रात्री सूर्यास्तापर्यंत ढिगारे उपसणे, मृतदेह बाहेर काढणे सुरू होते. चार दिवसांत अनेक घरांचे ढिगारे उपसले.

पावसामुळे चिखल झाल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्यात १५ ते २० मृतदेह सापडले. रात्री बस किंवा ट्रकमध्ये झोपावे लागत होते. वीज नसल्याने बसच्या उजेडात आचारी जेवण तयार करायचे. जेवण काय तर डाळ-खिचडी. त्यावर मात करून या पथकाने अत्यंत शिस्तबद्धपणे केलेल्या कामाचे शरद पवार यांच्यासह अनेकांनी कौतूक केले.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार पथकाने दोन्ही गावांत मोठे मदतकार्य केले. आम्ही पुण्यातूनच शिधा, आवश्यक हत्यारे असे सर्व साहित्य घेऊन गेल्याने तिथे कुणावरही कसलाच ताण पडला नाही. अत्यंत भयानक स्थितीत सर्वांनी काम केले. हे पालिकेचे सर्वांत मोठे एकमेव पथक होते. या मदतकार्यात सहभागी होता आले याचे समाधान वाटते. - अंकुश काकडे,
तत्कालीन नगरसेवक, प्रवक्ते, राष्ट्रवादी

पथकातील सर्व कर्मचारी व अधिकाºयांच्या कामाचे नियोजन, राहणे, जेवणाची व्यवस्था याची जबाबदारी माझ्यावर होती. अशा परिस्थितीत काम करण्याचा कुणालाच अनुभव नसल्याने मोठी समस्या होती. पण योग्य नियोजन व खबरदारीमुळे आम्ही चांगले काम केले. त्या वेळी अत्यंत खडतर परस्थिती असल्याने आज २५ वर्षांनंतरही अंगावर शहारे येतात.
- डॉ. दिलीप परदेशी,
तत्कालीन सहायक आरोग्य प्रमुख

 

Web Title: 25 years after earthquake earthquake, rock-clay erosion and death mound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.