Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 07:31 PM2021-11-26T19:31:49+5:302021-11-26T19:33:03+5:30
लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.
पुणे : महापालिकेच्या १८५ केंद्रांवर शनिवारी २७ तारखेला प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर ५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( ४ सप्टेंबरपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन लसीचा ३० ऑक्टोबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.