एसटीच्या २५ हजार फेऱ्या रद्द, अघोषित संपाने प्रवाशांचे हाल,  १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 05:39 AM2018-06-09T05:39:22+5:302018-06-09T05:39:22+5:30

वेतनवाढ मान्य नसल्याचे सांगून गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचा-यांमुळे वाहतूकसेवा ठप्प झाली.

 25,000 fairs of ST canceled, unauthorized traffic accidents, 15 crores of rupees recovered | एसटीच्या २५ हजार फेऱ्या रद्द, अघोषित संपाने प्रवाशांचे हाल,  १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला

एसटीच्या २५ हजार फेऱ्या रद्द, अघोषित संपाने प्रवाशांचे हाल,  १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला

Next

पुणे : वेतनवाढ मान्य नसल्याचे सांगून गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचा-यांमुळे वाहतूकसेवा ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले. पर्यायी व्यवस्था नसल्याने खासगी बसचालकांना मागेल ते भाडे देऊन प्रवास करावा लागल्याचे चित्र होते. या बंदमुळे तब्बल २५ हजार फेºया रद्द झाल्या असून, एसटीचे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची मागिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
कर्मचारी संघटनांनी कोणतीही पूर्वसूनचा न देता अचानक संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे शहरासह विविध ठिकाणच्या एसटी बस स्थानकांत प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. कोणत्याही संघटनेने संपाला पाठिंबा दिला नसला, तरी शिवसेनाप्रणीत कामगार संघटना या संपात सहभागी झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील २५० बस आगारांतून दुपारी चारपर्यंत ३० टक्के बसफेºया झाल्या. एकूण ३५ हजार २४९ फेºयांपैकी १० हजार ३९७ फेºया सुरळीत झाल्या. या संपाची तीव्रता मुख्यत्वे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर जाणवली. त्यातुलनेत मराठवाडा आणि विदर्भातील ६० टक्के वाहतूक सुरळीत होती. राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने, तर १४५ आगार अंशत: सुरू असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, ८० आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. सुरू असलेल्या बससेवेत करारावरील बसचा जास्त भरणा होता. पुणे विभागातील १३ बस डेपोंमधून सायंकाळी ६ पर्यंत १ हजार ३०३ बस सुटणे अपेक्षित होते. त्यांपैकी केवळ २१३ बस जाऊ शकल्या. पुणे विभागातील १३ बस डेपोंपैकी तळेगाव, सासवड आणि चिंचवड डेपोतून एकही बस बाहेर पडली नाही.

कामगारांचे उत्स्फूर्त आंदोलन असल्याचा दावा
संघटनेने संपाची नोटीस न देता राज्यातील एसटी कामगार मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला, याचा अर्थ कामगारांना दिलेली वेतनवाढ समाधानकारक नाही. परिवहनमंत्र्यांनी देऊ केलेल्या ४ हजार ८८९ कोटी रुपयांच्या वेतनवाढीबाबत कामगारांमध्ये असंतोष आहे. ज्या चालक-वाहकांना ही वेतनवाढ मान्य नाही, त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन कंत्राटी पद्धतीवर सेवा स्वीकारावी अशी कलेली सक्ती, थकबाकीची रक्कम ४८ हप्त्यांत देणे, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ वरून २ टक्के करणे, भाडे भत्ता कमी करणे यामुळे कर्मचाºयांनी शुक्रवारपासून (दि. ८) उत्स्फूर्त अंदोलन केले असावे, असे पत्रक महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि महासचिव हनुमंत ताटे यांनी काढले आहे. परिवहनमंत्र्यांनी जाहीर केलेल्या वेतनवाढीपेक्षा अधिक रक्कम कामगारांना मिळू शकते. त्यासाठी परिवहनमंत्र्यांनी संघटनेशी चर्चा करून उभयपक्षी मान्य तोडगा काढावा, असेही या पत्रकात म्हटले आहे.

वेतनवाढ मान्य नसलेल्यांनी अर्ज करावा
वेतन कराराबाबत मान्यताप्राप्त कामगार संघटनेशी दीर्घ काळ चर्चा चालू होती. त्यातून मार्ग न निघाल्याने ४ हजार ८४९ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. ज्यांना वेतनवाढ मान्य नाही, त्यांनी ९ जूनपर्यंत लेखी निवेदन सादर करावे. औद्योगिक न्यायाधिकरणाकडे सुरू असलेल्या प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्या दराने वेतन घ्यावे, असे पत्रक एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी काढले आहे.

Web Title:  25,000 fairs of ST canceled, unauthorized traffic accidents, 15 crores of rupees recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.