पुरंदरमध्ये २५१ कोरोनाबाधित.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:16+5:302021-04-27T04:11:16+5:30

सासवड येथील शासकीय लॅबमध्ये २८२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली पैकी १०६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड ...

251 corona affected in Purandar. | पुरंदरमध्ये २५१ कोरोनाबाधित.

पुरंदरमध्ये २५१ कोरोनाबाधित.

Next

सासवड येथील शासकीय लॅबमध्ये २८२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली पैकी १०६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड ४८, ग्रामीण भागातील पिसर्वे ५, भिवरी व वाघापूर ४, पारगाव, काळदरी, पवारवाडी, चांबळी प्रत्येकी ३, धनकवडी, बोपगाव, अंबोडी, सोनोरी, सुपे, कोडीत, गुरोळी, केतकावळे, सिंगापूर प्रत्येकी २, आंबळे, माळशिरस, पिंपळे, खळद, हिवरे, गराडे, उदाचीवाडी, नाझरे, दिवे, सटलवाडी, वाळुंज, वीर प्रत्येकी १ असे ग्रामीण भागातील ५६, तर तालुक्या बाहेरचे २ रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये १९७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली पैकी ११४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी २०, राख ९, राजुरी व भोसलेवाडी ७, धालेवाडी व गुळुंचे ६, नीरा, मावडी सुपे प्रत्येकी ५, बेलसर, तक्रारवाडी, कोळविहीरे, मावडी क.प प्रत्येकी ४, नाझरे क.प, व वाळुंज ३, जवळार्जुन २, साकुर्डे, पिंपरी, लपतळवाडी, खळद, तक्रारवाडी, थोपटेवाडी नावळी, भोरवाडी प्रत्येकी १, असे ग्रामीण भागातील ८० तर तालुक्या बाहेरचे मोरगाव ८, मुर्टी २, बाबुर्डी, मोढवे १ व पुणे शहर २ असे १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील

जेजुरी शासकीय लॅबमध्ये दि. २६ मार्च रोजी घेतलेल्या २७ आर.टी.पी.सी.आर. स्वॅब पैकी १५ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी १२, भोसलेवाडी १, बारामती तालुक्यातील जोगवडी, तरडोली प्रत्येकी १ कोरोना अहवाल सोमवार दि. २६ रोजी बाधित आले आहेत.

वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली, पैकी १६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. आडाचीवाडी, दौंडज, जेऊर, नीरा, वागदरवाडी, गुळुंचे प्रत्येकी २, वाल्हे, सुकलवाडी, मांडकी प्रत्येकी १, असे तालुक्यातील १५, तर तालुक्याबाहेरचे चोपडेवाडी १ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

Web Title: 251 corona affected in Purandar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.