श्रवणयंत्रासाठी २५५ कर्णबधिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:45+5:302021-08-26T04:12:45+5:30
बारामती : येथे श्रवणयंत्रासाठी २५५ हून अधिक कर्णबधिर नागरिकांची तपासणी सोमवार, मंगळवारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार ...
बारामती : येथे श्रवणयंत्रासाठी २५५ हून अधिक कर्णबधिर नागरिकांची तपासणी सोमवार, मंगळवारी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, स्वरूप फाउंडेशन मुंबई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि ठाकरशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कानाच्या श्रवणयंत्र मशीनसाठी मोजमाप पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले, तर स्वागत शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरामध्ये एकूण २५५ कर्णबधिर ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची पूर्व मोजमाप तपासणी करण्यात आली. कानांची मोजमाप तपासणी स्वरुप फाऊंडेशनच्या डॉक्टर्स स्टापने केली तर मदतकार्य शारदानगर नर्सिंग स्कूलमधील विद्यार्थिनींनी केले. या वेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, खाजगी सचिव हनुमंत पाटील, उपसभापती रोहित कोकरे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, स्वीय सहायक नितीन सातव, बारामती यशस्विनी सामजिक अभियान सहसमन्वयिका दीपाली पवार, नीलेश जगताप, नितीन काकडे आदी उपस्थित होते.
कर्णबधिर नागरिकांची तपासणी करण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संभाजी होळकर व उपसभापती रोहित कोकोरे उपस्थित होते.
२५०८२०२१-बारामती-०२