Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५७ जण कोरोनामुक्त; तर २७४ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:36 PM2021-06-27T18:36:30+5:302021-06-27T18:36:43+5:30

शहरात २ हजार ४१९ सक्रिय रुग्ण, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.१९ टक्के

257 people released from corona in Pune on Sunday; While 274 new patients | Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५७ जण कोरोनामुक्त; तर २७४ नवे रुग्ण

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५७ जण कोरोनामुक्त; तर २७४ नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देशहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २९६ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४३१ इतकी आहे.

पुणे: शहरात रविवारी नव्याने २७४ कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात २५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजमितीला शहरात २ हजार ४१९ सक्रिय रुग्ण आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार २७१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.१९ टक्के इतकी आहे. आज १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २९६ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४३१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ५१ हजार ७२० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७७ हजार ५८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६६ हजार ५९४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 257 people released from corona in Pune on Sunday; While 274 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.