नातवाच्या हव्यासापोटी गमावले २६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:02 AM2018-02-06T01:02:21+5:302018-02-06T01:02:41+5:30

नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला खासगी कंपनीतील ज्येष्ठ कर्मचारी बळी पडला़ भरभराट दूरच, पण निवृत्तीनंतर मिळालेले तब्बल २६ लाख रुपये गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली

26 lakhs lost to grandchildren | नातवाच्या हव्यासापोटी गमावले २६ लाख

नातवाच्या हव्यासापोटी गमावले २६ लाख

Next

पुणे : नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला खासगी कंपनीतील ज्येष्ठ कर्मचारी बळी पडला़ भरभराट दूरच, पण निवृत्तीनंतर मिळालेले तब्बल २६ लाख रुपये गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली़ मांजरी येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आली असून हडपसर पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे़ त्याची साथीदार महिला मात्र फरारी झाली आहे़
सुनील रामशरण सरोज (वय ५०, रा़ थिटे शाळेजवळ, खराडी) असे या भोंदू बाबाचे नाव असून हडपसर पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी समीर विलास कामठे (वय ३३, रा़ महादेवनगर, मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे़ समीर यांचे वडील एका खासगी कंपनीत कामाला होते़ तेथेच सुनीलही कामाला आहे़आपल्या मुलाला मुलगा हवा असे त्यांनी सुनीलला सांगितले़ त्याने आपल्या ओळखीची एक महिला आहे़ तिने सांगितलेले उपाय केले तर हमखास मुलगा होईल, असे सांगून त्याने विलास कामठे यांना खराडी येथील महिलेकडे आॅक्टोबर २०१६ ला घेऊन गेला़ सुनील व या महिलेने त्यांना वश करून आपण सांगू तसे करण्यास लावले़
>बँक पासबुकमुळे प्रकार उघडकीस
विलास कामठे यांना डिसेंबर २०१७ मध्ये मानसिक धक्का बसला़ त्यामुळे ते घरात विचित्र वागू लागले़ त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले़
त्यांच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू असताना कुटुंबातील सदस्यांनी कपाटातील त्यांचे बँक पासबुक पाहिले़ त्यातील उलाढाल पाहून त्यांना धक्का बसला़ मार्च २०१७ मध्ये विलास कामठे यांनी सेवानिवृत्ती घेतली़ सेवानिवृत्तीचे मिळालेले पैसे व त्याअगोदर त्यांच्या बँक खात्यात मोठ्या रक्कमा ट्रान्स्फर केल्याचे दिसून आले़
त्याची अधिक माहिती घेतल्यावर त्या सुनील याच्या नावावर ट्रान्स्फर झाल्याचे लक्षात आले़ त्यातून हा
प्रकार उघडकीस आला़
त्यानंतर त्यांचा मुलगा
समीर कामठे यांनी पोलिसांत धाव घेतली़ आम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या तर मुलगा होईल व घरात आर्थिक भरभराट होईल, नाही केले तर तुमच्या घरावर अनिष्ट संकट येईल़ तुमच्या घरातील लोकांचे मृत्यू होईल, अशी जादूटोण्याची भीती दाखविली़ त्यामुळे विलास कामठे ते ाांगतील तसे करत गेले़ गेल्या वर्षी त्यांनी एक वर्षे अगोदरच सेवानिवृत्ती घेतली़
सुनील व या महिलेने आॅक्टोबर २०१६ पासून वेळोवेळी ९ लाख रुपये रोख व १७ लाख २० हजार रुपये खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले़

Web Title: 26 lakhs lost to grandchildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.