जिल्ह्यातील २६ पालक गमावलेल्या बालकांच्या संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:30+5:302021-06-17T04:09:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे जिल्ह्यातील २६ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. अशा बालकांचा संपत्तीचा अधिकार अबाधित ...

26 parents in the district will keep the property rights of the lost children unaffected | जिल्ह्यातील २६ पालक गमावलेल्या बालकांच्या संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवणार

जिल्ह्यातील २६ पालक गमावलेल्या बालकांच्या संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे जिल्ह्यातील २६ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. अशा बालकांचा संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने अशा बालकांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह जिल्हास्तरीय कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतिदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेले अशा बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी, त्यासाठी गृहभेटी द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करून देण्याबाबत देण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, चाईल्ड हेल्प लाईन क्र. १०९८ चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे, निरीक्षणगृहांकरिता तत्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात यावीत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे. बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासोबतच बालकाचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले की, ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत त्या बालकाच्या पुनर्वसनासाठी भरोसा सेलची टीमही गृहभेटी देणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: 26 parents in the district will keep the property rights of the lost children unaffected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.