चार महिन्यांत २६ हजार मुले बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:24+5:302021-06-16T04:12:24+5:30
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर खबरदारी घेण्यात ...
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर साधारण १ मार्चपासून २६ हजार २९२ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २५ हजार ७९९ मुले पूर्णपणे बरी झाली आहेत. हे प्रमाण या काळात पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांच्या तुलनेत दहा टक्के असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी दिली.
शहरामध्ये १ मार्च ते ९ जूनदरम्यान २ लाख ७० हजार ३३७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण २६ हजार २९२ बाधित मुलांपैकी विविध दवाखान्यांमध्ये ४८४ मुलांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ६२ मुले ही साध्या बेडवर उपचार घेत आहेत. तर, ९ मुले ऑक्सिजनवर आहेत. गेल्या ४ महिन्यांत ९ मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात लहान मुलांसाठी एकूण १ हजार १४८७ बेड तयार आहेत. त्यापैकी ६२३ हे ऑक्सिजन बेड आहेत. तर १७७ आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी ९५ व्हेंटिलेटर बेड आहेत.
----
चौकट -
रुग्णालयांची संख्या - २९
एकूण बालरोगतज्ज्ञ - २५०
सध्या बेड - ५७३
सध्या आयसीयू खाटा - ६५
व्हेंटिलेटर - ४८