गुंतवणूक २६७ कोटींची, वसुली १०७३ कोटी

By admin | Published: September 23, 2015 03:05 AM2015-09-23T03:05:10+5:302015-09-23T03:05:10+5:30

पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’बरोबरच पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे रुंदीकरण करुन त्यावरही टोल आकारण्यास सुरुवात झाल्यापासून जून २०१५ अखेर या महामार्गावर

267 crores of investment, Recovery 1073 crores | गुंतवणूक २६७ कोटींची, वसुली १०७३ कोटी

गुंतवणूक २६७ कोटींची, वसुली १०७३ कोटी

Next

विवेक भुसे, पुणे
पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’बरोबरच पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे रुंदीकरण करुन त्यावरही टोल आकारण्यास सुरुवात झाल्यापासून जून २०१५ अखेर या महामार्गावर तब्बल १०७३ कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला असून उद्दिष्टापेक्षा तो कितीतरी अधिक झाला आहे़ विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आयआरबीने केवळ २६७ कोटी रुपये गुंतवले आहेत़
गेल्या ११ वर्षापासून गोपनीय ठेवलेली ही कागदपत्रे राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशामुळे रस्ते विकास महामंडळाने शेवटी नाईलाजाने वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली आहे़
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला त्यावर टोल देण्यापेक्षा जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरुन जाण्याला वाहनचालक पसंती देत होते़ त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करुन त्यावरही टोल आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यानुसार हे काम आयआरबीला देण्यात आले़ राज्य रस्ते विकास महामंडळाबरोबर झालेल्या करारानुसार आयआरबी कंपनीने एक्सप्रेस वे व महामार्ग क्रमांक ४ साठी एकरक्कमी ९१८ कोटी रुपये देऊन दोन्ही महामार्गावरील टोल वसुलीचा ठेका घेतला़ सप्टेंबर २००६ पासून टोल वसुलीस सुरुवात झाली़
आयआरबीने २००६-०७मध्ये ६०़४९ कोटी रुपये टोल वसुल होईल, असे गृहीत धरले होते़ प्रत्यक्षात सप्टेंबर ते डिसेंबर २००६ या चार महिन्यात २२ कोटी ३२ लाख ८४ हजार रुपये आणि २००७ या वर्षात ८१ कोटी ७६ लाख ६७ हजार ८२२ रुपये टोल वसुल केला आहे़ डिसेंबर २०१४ अखेर कंपनीने ९८२ कोटी ८७ लाख ६६ हजार ३२३ रुपये टोल वसुल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 267 crores of investment, Recovery 1073 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.