मंगळवारी २६८ कोरोनाबाधित : २३२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:22+5:302021-06-30T04:08:22+5:30
पुणे : शहरात मंगळवारी २६८ कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात २३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आजमितीला शहरात २ ...
पुणे : शहरात मंगळवारी २६८ कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात २३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आजमितीला शहरात २ हजार २३२० सक्रिय रुग्ण आहेत़
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ३६२ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.९९ टक्के इतकी आहे. आज १४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २८८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ६१ हजार २५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७८ हजार ९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ६७ हजार १०६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------