२७ मद्यपी वाहनचालकांना १५ दिवसांची कैद

By admin | Published: April 14, 2016 02:27 AM2016-04-14T02:27:00+5:302016-04-14T02:27:00+5:30

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल २७ वाहनचालकांना मोटार वाहन न्यायालयाने बुधवारी १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयदेव घुले यांच्या

27 drunken drivers for 15 days imprisonment | २७ मद्यपी वाहनचालकांना १५ दिवसांची कैद

२७ मद्यपी वाहनचालकांना १५ दिवसांची कैद

Next

पुणे : मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल २७ वाहनचालकांना मोटार वाहन न्यायालयाने बुधवारी १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयदेव घुले यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत २७ जणांना मद्य पिऊन वाहन चालविताना पकडण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने ५ हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर २७ जणांची सुटका केली. प्रसाद पालकर (वय ५३), तन्वीर अबरार (३२), संजय जाधव (२७), बापू मते (४९), साबीर शेख अब्दुल मजीद (३७), नीलेश भईरी (२९), योगेश बर्वे (२६), सचिन मेश्राम (२४), समाधान जगधने (२२), चारुदत्त भुजबळ (३४), मयंक सिन्हा (२४), प्रकाश शिंदे (३९), शारदा तिवारी (३१), शैलद्र दिवाकर (२७), धनंजय थिटे (३८), पंढरीनाथ सोलनकर (५०), अभिषेककुमार सिंग (२०), विठ्ठल रूपनवर (४८), भरत बोहोत (२०), शिवाजी वाघमारे (४३), श्रीकांत लोंढे (२८), अमरजित कुसवाह (२५), सतीश गोतपागर (४७), तानाजी कांबळे (३२), रोहन डोंगळे (१९), लिंगप्पा गुत्तरगी (५८) अशी शिक्षा झालेल्या २७ जणांची नावे आहेत. (प्रतिनिधी)

प्रथमच कैद
मद्यपी वाहनचालकांविरुद्धच्या खटल्यात पहिल्यांदाच कैदेची शिक्षा झाल्याची चर्चा न्यायालयात रंगली होती. अशा खटल्यांमध्ये संबंधित वाहनचालकांना गुन्हा कबूल केल्यानंतर अनेकदा दंड भरण्यास सांगून सुटका केली जाते. एक दिवस न्यायालयात उभे राहण्याची शिक्षाही दिली आहे.

Web Title: 27 drunken drivers for 15 days imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.