ओतूर परिसरात दोन दिवसात २७ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:17+5:302021-05-19T04:12:17+5:30
डिंगोरे गावात सोमवारी ३ व मंगळवारी ९ असे एकूण १२ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या २२४ झाली आहे. १९१ ...
डिंगोरे गावात सोमवारी ३ व मंगळवारी ९ असे एकूण १२ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या २२४ झाली आहे. १९१ बरे झाले आहेत. २६ जण उपचार घेत आहेत. ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ओतूर शहरात सोमवारी ३ मंगळवारी ४ असे ७ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ९२८ झाली आहे. ८४२ बरे झाले आहेत ५१जण उपचार घेत आहेत. ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
नेतवडमाळवाडी येथे सोमवारी २ सोमवारी १ ,त्यामुळे येथील बाधितांची संख्या ७१ झाली आहे. ५६ बरे झाले आहेत१४ जण उपचार घेत आहेत एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी खामुंडी १, चिल्हेवाडी ३, नवीन असे १८ रुग्ण सापडले आहेत.
खामुंडी येथील ९८ पैकी ८७ बरे झाले आहेत ५ जण उपचार घेत आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
चिल्हेवाडी त याच महिन्यात १८ नवीन रुग्ण सापडले. कोरोनाच्या साथीपासून हे गाव मुक्त होते. येथील १० बरे झाले आहेत. ७ जण उपचार घेत आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. यादव शेखरे म्हणाले.