शिरूर तालुक्यातील ६३ गावांत २७१ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:59+5:302021-05-03T04:06:59+5:30

शिरूर तालुक्यात आजपर्यंत १७११७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, १४५२२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. २७१ जणांचा मृत्यू झाला, २३२३ विविध ...

271 corona affected in 63 villages of Shirur taluka | शिरूर तालुक्यातील ६३ गावांत २७१ कोरोनाबाधित

शिरूर तालुक्यातील ६३ गावांत २७१ कोरोनाबाधित

Next

शिरूर तालुक्यात आजपर्यंत १७११७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, १४५२२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. २७१ जणांचा मृत्यू झाला, २३२३ विविध रुग्णालयांत उपचार घेत आहे.

शिरूर तालुक्यात आज सणसवाडी १२, शिक्रापूर २२, तळेगाव ११, कासारी १, निमगाव म्हाळुंगी ४, कोंढापुरी १, धानोरे १, डिंग्रजवाडी १, टाकळी भीमा १, कोरेगाव भीमा ६, गणेगाव खालसा २, रांजणगाव ८, करंजावणे २, सोनेसांगवी १, वाघाळे ७, ढोकसांगवी १, खंडाळे २, कुरूळी २, मांडवगण फराटा ७, पिंपळसुटी २, इनामगाव २, वडगाव रासाई २, शिरसगाव काटा ६, न्हावरे १०, कोळगाव डोळस १, उरळगाव ३, नागरगाव ११, आलेगाव पागा ४, आंबळे ६, चिंचणी १, आंधळगाव ३, निमोने ३, निमगाव डुडे १, पिंपरखेड ६, जांबुत ६, फाकटे ३, चांडोह १, म्हसे बुद्रुक १, डोंगरगण १, टाकळीहाजी ११, कारेगाव ६, शिरूर ग्रामीण ६, बाभुळसर खुर्द २, गोलेगाव २, तरडोबाचीवाडी १, करडे २, मलठण १०, निमगाव भोगी १, अण्णापूर २, मोराची चिंचोली १, सविंदणे २, कानुर मेसाई ३, कवठे यमाई १, केंदुर १, जातेगाव खुर्द १, जातेगाव बुद्रुक १, पिंपळे धुमाळ २, पाबळ १०, मुखई २, खैरेनगर २, वढू बुद्रुक ४, शिरूर शहर १९ असे शिरूर तालुक्यातील ६३ गावात २७१ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर १ जणाचा मृत्यू झाला.

शिरूर तालुक्यात वाढता कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कराव असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.

शिरूर तालुक्यात वाढता कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टन्स पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.

Web Title: 271 corona affected in 63 villages of Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.