इंदापुरातील २८ जणांवर तडीपारी
By admin | Published: February 17, 2017 04:28 AM2017-02-17T04:28:01+5:302017-02-17T04:28:01+5:30
गेल्या निवडणुकीदरम्यान इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, अशा २८ जणांवर जिल्हा परिषद
इंदापूर : गेल्या निवडणुकीदरम्यान इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, अशा २८ जणांवर जिल्हा परिषद निवडणूक मतदानाच्या काळात तात्पुरती तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली.
ते म्हणाले, की गेल्या निवडणुकीच्या वेळी इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यांच्याकडून या निवडणुकीच्या मतदानादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये. मतदानप्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी. यासाठी गुन्हे दाखल झालेल्यांची माहिती काढून त्या २८ जणांना तात्पुरते तडीपार करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रस्ताव इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने आपण प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने दि. १७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत वरील लोकांना तात्पुरते तडीपार करण्यासंदर्भात निकम यांनी आदेश दिला आहे.
तात्पुरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : पराग गणपत राऊत, सुनील उत्तम राऊत,चंद्रकांत काशीनाथ राऊत (निमगाव केतकी), महेश तुकाराम सुर्वे, आप्पा पांडुरंग बंडगर, हर्षद विलास जगताप, संजय बाळासोा जगताप, औदुंबर धनाजी भोसले, सचिन बाबूराव तोबरे (वडापुरी).
दिलीप कांतिलाल तरंगे, मंगेश कांतिलाल तरंगे, मोहन सर्जेराव तरंगे, श्रीनिवास मधुकर तरंगे, अर्जुन पोपट तरंगे, अरविंद सर्जेराव तरंगे, सुरेश पोपट तरंगे, कांतिलाल भीमराव तरंगे, छबुलाल भीमराव तरंगे, मधुकर भीमराव तरंगे, प्रशांत बबन तरंगे, आबासाहेब भीमराव तरंगे (रेडणी).
शत्रुघ्न अभिमन्यू शिंदे, ऋषीकेश अभिमन्यू शिंदे, प्रशांत सोमनाथ शिंदे, विकास सहदेव शिंदे, दादा सखाराम चोरमले, अंकुश अर्जून शिंदे, दशरथ सखाराम चोरमले (शिरसोडी). कारवाई झालेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवाराच्या पतीचा व दीराचा समावेश आहे. (वार्ताहर)