कोरोनामुक्त २८ व्यक्तींनी केले प्लाझ्मादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:15+5:302021-04-29T04:08:15+5:30
कोरोनावर प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असून, ज्या व्यक्तीने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलेली असते, तिच्या रक्तामध्ये कोरोना प्रतिबंधक अँन्टी बाॅडी ...
कोरोनावर प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असून, ज्या व्यक्तीने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलेली असते, तिच्या रक्तामध्ये कोरोना प्रतिबंधक अँन्टी बाॅडी तयार झालेल्या असतात. अशा व्यक्तीचा प्लाझ्मा अन्य रुग्णांना कोरोनावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतो. प्लाझ्मा दान हेच जीवनदान आहे. धनकवडीमधील शिवसूर्य प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत २८ व्यक्तींनी प्लाझ्मादान केल्याने आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित व्यक्तींना जीवनदान मिळाले.
कोरोना संसर्गाच्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत असल्याने प्लाझ्माची मागणी वाढली आहे.
यामध्ये पाचशेहून अधिक लोकांची माहिती गणेश जगताप व राकेश शेटे यांच्यासह शिवसूर्यचे प्रतिष्ठान अध्यक्ष रवींद्र बोडके आदींनी भरून घेतली. दरम्यान, रवींद्र बोडके यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मा दानासाठी प्रोत्साहित केले. त्यापैकी २८ जणांनी प्लाझ्मा दान केला.