वेल्हे पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी २.कोटी ८४ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:20+5:302021-09-24T04:13:20+5:30
वेल्हे पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत नसल्याने ठाण्याचे कामकाज भाडयाच्या इमारत सुरू आहे. वेल्हे येथे पोलीस ठाण्याला स्वत:ची जागा आहे. ...
वेल्हे पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत नसल्याने ठाण्याचे कामकाज भाडयाच्या इमारत सुरू आहे. वेल्हे येथे पोलीस ठाण्याला स्वत:ची जागा आहे. मात्र, इमारतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संबंधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे प्रलंबित आहे. तरी या प्रस्तावास मान्यता देऊन निधी मंजूर करावा, असे पत्र दि. ४ सप्टेंबर रोजी आमदार संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते. त्याप्रमाणे अजित पवार यांनी प्रस्तावास मान्यता देऊन २ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
वेल्हे तालुक्यात एकूण १२४ गावे असून वेल्हे पोलीस स्टेशनचे कामकाज दहा बाय दहाच्या खोलीत सुरू होते, तर इमारतीअभावी पोलीस स्टेशनचे कामकाज करणे अवघड झाले होते. गुन्हेगारांसाठी कच्चे लॅाकअप, अधिकाऱ्यास स्वतंत्र खोली, ठाणे अंमलदार, मुद्देमाल जमा करण्यासाठी खोली, कर्मचाऱ्यांना निवासाची सोय, आदी प्रश्न स्वातंत्र्यानंतर प्रलंबितच होते. निधी मंजूर झाल्याने वेल्हे पोलीस स्टेशनच्या इमारतीचा अनेक वर्षांचा प्रश्न यामुळे मिटला आहे.