सासवड येथे २८६ विविध खटले निकाली
By admin | Published: April 10, 2017 02:07 AM2017-04-10T02:07:32+5:302017-04-10T02:07:32+5:30
तालुका विधी सेवा समिती आणि सासवड बार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये
सासवड : तालुका विधी सेवा समिती आणि सासवड बार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये विविध विभागांची सुमारे २७ लाख रुपये इतकी विक्रमी वसुली करण्यात आली. तसेच सुमारे २८६ विविध खटले तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आले, अशी माहिती बारचे अध्यक्ष अॅड. महेश जाधव यांनी दिली.
या लोकअदालतमध्ये यामधील मुख्य दिवाणी न्यायाधीश न्या. जाधव यांच्याकडील दिवाणी, फौजदारी, १३८ यांची सुमारे २९३ खटले, सहन्यायाधीश दिंडे यांचेकडील २८२ तसेच न्यायाधीश साळुंखे यांचेकडील १२५ असे एकूण ७०० खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र वीज मंडळाकडील सासवड विभागातील ४०० आणि नीरा विभागातील २९४ प्रकरणे, सासवड नगरपालिकेकडील ४७३ प्रकरणे, तर ग्रामपंचायतीपैकी मावडी कपची - २८०, पिंपळे - १६७, पिंगोरी - ११४, पिंपरे खुर्द - १३०, जेऊर - ११३, पारगाव मेमाणे - २०७, कोडीत खुर्द - ८४, वाल्हे - १४७, अशी एकूण २४४५ प्रकरणे असून, सर्व मिळून सुमारे ३०४७ इतकी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
त्यापैकी दाखल दिवाणी व फौजदारी एकूण ६३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन २० लाख ८८ हजार ५०० इतकी वसुली करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, सासवड नगरपालिका, तसेच ग्रामपंचायत यांची ६ लाख १२ हजार ५४४ रुपये विविध करांपोटी तडजोड करून वसुली करण्यात आली. अशी एकूण २७ लाख १०४४ इतकी वसुली झाली. या वेळी सहन्यायाधीश व्ही. बी. साळुंखे तसेच बारचे अध्यक्ष अॅड. महेश जाधव, उपाध्यक्ष अॅड. सचिन कुदळे, अॅड. विलास खंडाळकर, अॅड. प्रशांत यादव, अॅड. अशोक भोसले, अॅड. बापुसो गायकवाड, प्रकाश बोत्रे, अॅड. बापूसो जगताप, अॅड. विशाल पोमण, पंढरीनाथ झेंडे, अॅड. तुषार मिरजकर, अॅड. राणी यादव, अॅड. सुनीता सस्ते, अॅड. प्रदीप धुमाळ, अॅड. दिगंबर पोमण, तसेच इतर वकील मंडळी, सहायक अधीक्षक श्रीमती पंत, श्रीमती खिरीड, कर्मचारी परशुराम देशमुख, बोत्रे आदी उपस्थित होते.
दरम्यान, दुपारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. कर्णिक यांनी सासवड न्यायालयात भेट देऊन लोकन्यायालयाची पाहणी केली. तसेच कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या वेळी बारचे अध्यक्ष अॅड. महेश जाधव यांनी कर्णिक यांचे बारच्या वतीने स्वागत केले. पॅनल जज म्हणून अॅड. अण्णासो खाडे, अॅड. बापूसो जगताप, अॅड. सुनील कटके, अॅड. तुकाराम पवार, अॅड. अश्पाक बागवान यांनी काम पहिले.