घोडधरणात पक्त २.८७ टक्के पाणीसाठा

By Admin | Published: March 17, 2016 03:05 AM2016-03-17T03:05:08+5:302016-03-17T03:05:08+5:30

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.

2.87 percent water stock in the crusher | घोडधरणात पक्त २.८७ टक्के पाणीसाठा

घोडधरणात पक्त २.८७ टक्के पाणीसाठा

googlenewsNext

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.
या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये शिरूर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आहे; मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे हे क्षेत्र घटत चालले आहे.
धरणाची पाणी साठवण क्षमता ५६३९ द. ल. घ. फू. एवढी असून, त्यापैकी २१७२ द. ल. घ.फू. मृत, तर ३४६७ द. ल. घ. फू. हा उपयुक्त पाणीसाठा मानला जातो. धरणाच्या उभारणीपासून आतापर्यंत संबंधित खात्याच्या वतीने धरणात साठलेला गाळ काढण्याची खास अशी व्यवस्था न झाल्याने धरणपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे.
अलीकडच्या काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने झालेल्या पाच धरणांमुळे बरेचसे पाणी वरच अडविले जाते. त्यामुळे २००० सालानंतर हे धरण अभावानेच १०० % भरले आहे.
याशिवाय धरणाच्या पाण्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखाना; तसेच रांजणगाव- कारेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखाने या पाण्यावर चालतात. हे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत व शिरूर -श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना या धरणामधून आहेत.
मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे धरणामध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वडज धरणातून ५०० द . ल. घ. फू. पाणी घोडधरणात सोडण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २७० ते २८० द.ल.घ. फू. एवढेच पाणी प्रत्यक्ष धरणात पोहोचले. सध्या धरणात केवळ २.८७ टक्के म्हणजे, १४४ द.ल.घ. फू.एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. साठलेल्या गाळामुळे हा साठा कमी ठरू शकतो. त्याचप्रमाणे इनामगाव, शिरसगाव, गणेगाव या भागात असलेले पाचही बंधारे कोरडे
आहेत. दि. ६ ते ११ मार्च या कालावधीत उजव्या व डाव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडले होते. (वार्ताहर)

उन्हाळी आवर्तन सोडता येणे शक्य नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे सध्या या भागात असलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात असून, उन्हाळ्यात पिके पाण्याअभावी जळून जातील. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Web Title: 2.87 percent water stock in the crusher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.