२८ वस्तीशाळा शिक्षक नियमित
By admin | Published: March 16, 2016 08:38 AM2016-03-16T08:38:15+5:302016-03-16T08:38:15+5:30
सन २00१पासून वस्तीशाळेवर रुजू झालेले, मात्र शैक्षणिक पात्रतेअभावी रखडलेल्या २८ शिक्षकांना मंगळावारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती
पुणे : सन २00१पासून वस्तीशाळेवर रुजू झालेले, मात्र शैक्षणिक पात्रतेअभावी रखडलेल्या २८ शिक्षकांना मंगळावारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या वेळी शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
जिल्ह्यात २00१ मध्ये वस्तीशाळा हा प्रयोग राबविण्यात आला. या वेळी १ हजार रुपये मानधन देऊन किमान पात्रता असलेल्या उमेदवारांना शिक्षक म्हणून घेण्यात आले होते. ५ वर्षे या शिक्षकांनी हजार रुपये मानधनावर काम केले. १ मार्च २0१४च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार २९४ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये नियमित प्राथमिक शिक्षक म्हणून सामवून घेण्याबाबत आदेश देण्यात आला. त्यानुसार ७ जुलै २0१४ रोजी २५३ शिक्षकांना नियमित करण्यात आले होते. त्यापैकी ४१ वस्तीशाळा शिक्षक अप्रशिक्षित होते.
डीएड न झालेल्या शिक्षकांना नाहीत त्यांना शासनामार्फत
लोणी काळभोर येथील संस्थेत सेवाअंतर्गत डीएडसाठी प्रवेश देण्यात आला होता. यातील २८ शिक्षकांना शैक्षणिक अर्हता पात्र झाल्याने मंगळावारी शुक्राचार्य वांजळे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. आता या शिक्षकांना ५२00-२0२00 ग्रेड वेतन २८00 या वेतश्रेणीनुसार वेतन मिळणार आहे.