ओतूर परिसरात दोन दिवसांत २९ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:52+5:302021-04-10T04:11:52+5:30
गेल्या दोन दिवसांत परिसरातील बाधितांची संख्या १ हजार १८१ झाली आहे. त्यातील ९८८ बरे झाले आहेत ११६ जण कोविड ...
गेल्या दोन दिवसांत परिसरातील बाधितांची संख्या १ हजार १८१ झाली आहे. त्यातील ९८८ बरे झाले आहेत ११६ जण कोविड सेंटर तर २६ जण घरीच उपचार घेत आहेत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. दि.९ एप्रिल रोजी ओतूर परिसरात २० पाॅझिटिव्ह सापडले त्यात डिंगोरे ३,ध़ोलवड २ ,ओतूर शहरात गुरुवारी ६ तर शुक्रवारी ११ असे एकूण १७ पाॅझिटिव्ह सापडले त्यामुळे ओतूर शहरातील बाधितांची संख्या ६०० झाली आहे त्यातील ५०५ बरे झाले आहेत ५४ जण कोविड सेंटर तर १६ जण घरीच उपचार घेत आहेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथे २ रुग्ण सापडल्याने येथील बाधितांची संख्या ५४ झाली आहे १५ जणावर उपचार सुरू आहेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दि.९ रोजी बल्लाळवाडी १ पाॅझिटिव्ह सापडला. तेथील बाधितांची संख्या ६० झाली आहे ५३ जण बरे झाले आहेत. ४ जण उपचार घेत आहेत एक जण घरीच उपचार घेत आहे. ३ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथे एक रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ४९ झाली आहे ३६ जण बरे झाले आहेत . ८ जण उपचार घेत आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. डुंबरवाडी येथे एक रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ३४ झाली आहे २९ बरे झाले आहेत ३ जण कोविड सेंटर तर २जण घरीच उपचार घेत आहेत हिवरे खूर्द येथील बाधितांची संख्या ४४ झाली आहे त्यातील ३४ बरे झाले आहेत ४ जण कोविड सेंटर तर ३ ,जण घरीच उपचार घेत आहेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. सारोक्ते यांनी सांगितले.