फुकट्या प्रवाशांकडून २९ लाखांची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 08:31 PM2019-06-07T20:31:47+5:302019-06-07T20:37:13+5:30

सुमारे ९ हजार ९०० प्रवाशांना प्रत्येकी ३०० रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे...

29 lakh penalty collected from free journey passengers | फुकट्या प्रवाशांकडून २९ लाखांची दंडवसुली

फुकट्या प्रवाशांकडून २९ लाखांची दंडवसुली

googlenewsNext
ठळक मुद्देजानेवारी महिन्यात सर्वाधिक ७ लाखांची दंडवसुली पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नियमितपणे बसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासणी

पुणे : बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून मागील पाच महिन्यात सुमारे २९ लाख ८२ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. सुमारे ९ हजार ९०० प्रवाशांना प्रत्येकी ३०० रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ७ लाखांची दंडवसुली झाली होती.
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून नियमितपणे बसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाते. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहे. यामध्ये एकुण १२ तिकीट तपासणीसांचा समावेश आहे. ही पथके दोन सत्रांमध्ये बसमध्ये तसेच बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांची तिकीटे तपासतात. त्यामध्ये विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी तसेच अन्य मार्गाच्या तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात येते. त्यांच्याकडून प्रत्येकी ३०० दंड वसुली केला जातो. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात ४ लाख ९४ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. एकुण १६४८ प्रवाशांना पकडण्यात आले होते. मागील पाच महिन्यांतील ही सर्वात कमी दंडवसुली राहिली.
सर्वाधिक फुकटे प्रवासी जानेवारी महिन्यात पकडण्यात आले. सुमारे २ हजार ३०० प्रवाशांकडून ७ लाख २ हजार ७०० प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर फुकट्या प्रवाशांमध्ये घट होत गेल्याचे आकडेवारीवरून दिसते. फेब्रुवारी महिन्यात ही वसुली ६ लाख ५६ हजार, मार्च महिन्यात ५ लाख ७६ हजार तर एप्रिल महिन्यात ५ लाख ५१ हजारांपर्यंत खाली आली. मे महिन्यामध्ये सर्व तिकीट तपासणींवर इतर कामांची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. बसवरील मार्ग फलकांची तपासणी, बस वेळेवर मार्गस्थ करण्यासाठी आगारांमध्ये भेटी, रद्द फेºया कमी करण्यासाठी पाठपुरावा, बसस्थानकांवर गाड्यांची तपासणी या कामांवर भर देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्यात तुलनेने कमी कारवाई झाल्याचे ‘पीएमपी’तील अधिकाºयांनी सांगितले.
--- 
फुकट्या प्रवाशांकडून करण्यात आलेली दंडवसुली
महिना        फुकटे प्रवासी    दंडवसुली
जानेवारी    २३४२        ७,०२,७००
फेब्रुवारी    २१८९        ६,५६,८००
मार्च         १९२०        ५,७६,२००
एप्रिल        १८३८        ५,५१,६००
मे        १६४८        ४,९४,४०० 

Web Title: 29 lakh penalty collected from free journey passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.