२९हजार ३९१ पिशवी कांदा बाजारभावात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:56+5:302021-08-13T04:13:56+5:30

-- ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारात गुरुवारी २९ हजार ३९१ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक होऊन ...

29,391 bags of onion market prices fall sharply | २९हजार ३९१ पिशवी कांदा बाजारभावात मोठी घसरण

२९हजार ३९१ पिशवी कांदा बाजारभावात मोठी घसरण

Next

--

ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारात गुरुवारी २९ हजार ३९१ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक होऊन नं. १ गोळा कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. नं. १ गोळा कांद्यास १० किलोस १७० रुपये ते १९० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे, कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.

गुरुवारी प्रतवारीनुसार १० किलोचे बाजारभाव पुढीलप्रमाणे - कांदा नं. १ (गोळा) १७० रुपये ते १९० रुपये, कांदा नं. २ (सुपर )१३० रुपये ते १७० रुपये, कांदा नं.३ (गोल्टा )-९० रुपये ते १३० रुपये, कांदा नं. ४-(गोलटी / बदला )-३० रुपये ते १०० रुपये, बटाटा लसूण आवक झाली नाही, असे कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले.

Web Title: 29,391 bags of onion market prices fall sharply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.