‘स्वाभिमानी’चा २९ रोजी साखर आयुक्तालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:15 AM2018-06-21T05:15:50+5:302018-06-21T05:15:50+5:30
उसाचा थकीत रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) तातडीने द्यावा, दुधाचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी २५ लाख टन दूध भुकटीचा बफर स्टॉक करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या दि. २९ रोजी साखर संकुलावर मोर्चा नेणार आहे.
पुणे : उसाचा थकीत रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) तातडीने द्यावा, दुधाचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी २५ लाख टन दूध भुकटीचा बफर स्टॉक करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या दि. २९ रोजी साखर संकुलावर मोर्चा नेणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने ऊस उत्पादकांना एफआरपी आणि त्यावर दोनशे रुपये देण्याचे मान्य केले होते. सध्या
घाऊक बाजारातील साखरेचे सध्याचे दरही प्रतिक्विंटलमागे ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकारने साखरेचा दर प्रतिक्विंटल २९००
रुपये ठरविला आहे. त्या नुसार
राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना कर्जाची उचल मिळणार आहे.
त्याच्या अंमलबजावणीचा
आदेश काढण्याची गरज आहे. बाजारातील स्थिती सकारात्मक असल्याने तातडीने एफआरपीची रक्कम द्यावी, अन्यथा तीव्र
आंदोलन करू, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.