बारामतीत बनावट व्यक्तीकडून खोटा दस्त करून माजी सैनिकाची ३ एकर जमीन बळकावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:50 PM2024-08-17T12:50:41+5:302024-08-17T12:50:58+5:30

मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता ;  शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

3 acres of ex soldiers land was seized by a fake person in Baramati | बारामतीत बनावट व्यक्तीकडून खोटा दस्त करून माजी सैनिकाची ३ एकर जमीन बळकावली!

बारामतीत बनावट व्यक्तीकडून खोटा दस्त करून माजी सैनिकाची ३ एकर जमीन बळकावली!

(बारामती) सांगवी : बनावट व्यक्ती व आधार कार्ड बनवून खोट्या व्यक्तीच्या मदतीने बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर उभे करून बेकायदेशीर दस्त करून माजी सैनिकाची ३ एकर जमीनीचा परस्पर व्यवहार करून  फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहॆ.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय बारामती जि.पुणे येथे हा प्रकार घडून आला. 

याबाबत फिर्यादी महादेव विठ्ठल कुंभार, (वय ६७), व्यवसाय सेवानिवृत्त सैनिक , रा. भिगवण रोड, पंचायत समितीजवळ, साईनगर बारामती जि पुणे. यांनी 
आरोपी (बनावट आधार कार्ड बनवलेला ) महादेव विठठल कुंभार, रा. मदनेवस्ती पिराळे नातेपुते ता. माळशिरस जि सोलापुर ), नितीन पंढरीनाथ दांगट रा. वडगाव बु. हवेली जि पुणे),गणेश एकनाथ मगर, रा. मगरपटटा हडपसर ता. हवेली जि. पुणे), अशोक केरभाउ भोरडे मु.पो. पिंपरी सांडस ता. हवेली जि पुणे) व इतर ५ ते ६ अनोळखी इसमांनी जमीन बळकावून फसवणूक केल्या बाबत फिर्याद दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

शासनाकडून सीलिंग मधून माझी सैनिक कुंभार यांना बारामती तालुक्यातील मूर्टी येथे ३ एकर जमीन मिळाली होती. तेथील एकूण ११८ गुंठे जमीन आरोपींकडून बळकावण्यात आली आहॆ.

मूर्टी येथील त्याच शेतीच्या गटात आणखी एकाची माजी सैनिक कुंभार यांच्या प्रमाणेच फसवणूक झाल्याचे कुंभार यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली.

आरोपी यांनी संगणमत करून बनावट आधारकार्ड बनवुन सेवा निवृत्त सैनिक महादेव कुंभार असल्याचे  भासवुन त्यांची जमिन बेकायदेशिररित्या बळकावण्यासाठी मे. दुय्यम निबंधक बारामती यांच्या कार्यालयात खोटा बिगर ताबा साठेखत दस्त क्र. १४६६/२०२४, १६ फेब्रुवारी २०२४ रोजी करून मोठी  फसवणुक केली आहॆ. याबाबत आरोपींचा तपास सुरू असून अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून लवकरच हे रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: 3 acres of ex soldiers land was seized by a fake person in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.