Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:02 PM2024-08-20T15:02:49+5:302024-08-20T15:03:07+5:30

पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

3 consecutive days of rain in Pune Next 2 days will be rainy Meteorological department predicts | Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज

Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे: सलग तीन दिवस सायंकाळी पुण्यात पावसाची हजेरी लागली असून, पुढील दोन दिवस पावसाचे असणार आहेत, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरातही पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण असमान आहे. बहुतांशी भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने सोमवारी (दि. १९) राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला, तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुधवारी (दि. २१) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

शहरातील सोमवारचा पाऊस

मगरपट्टा : ३८ मिमी
हडपसर : २१ मिमी
भोर : १५ मिमी
ढमढेरे : ९.५ मिमी
वडगावशेरी : ७ मिमी
शिवाजीनगर : ४.२ मिमी
लोणावळा : ३.५ मिमी
हवेली : ३.५ मिमी
कोरेगाव पार्क : १.५ मिमी

Web Title: 3 consecutive days of rain in Pune Next 2 days will be rainy Meteorological department predicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.