आंबेगाव पंचायत समिती इमारतीसाठी ३ कोटी ४ लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:19+5:302021-05-01T04:10:19+5:30
घोडेगाव येथे असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीसाठी ४३४.२५ लाख रूपयांना दि.२ जुलै २०१४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती व ...
घोडेगाव येथे असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीसाठी ४३४.२५ लाख रूपयांना दि.२ जुलै २०१४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती व हे बांधकाम दि.२९ डिसेंबर २०१८ रोजी पुर्ण झाले. परंतू इमारतीच्या प्रशासकीय मान्यते मध्ये फर्निचर व इतर उपकामांच्या बाबी समाविष्ट नव्हत्या. तरीही जुनेच फर्निचर वापरून या इमारतीमध्ये पंचायत समिती कार्यालय सुरू करण्यात आले.
पंचायत समितीमधील सर्व कार्यालये अद्ययावत सुरू होण्यासाठी फर्निचर व इतर उपकामांची आवश्यकता होती. ही बाब गृहमंत्री दिलीप वळसे पाटील लक्षात घेऊन या कामांना निधी उपलब्ध करण्यासाठी सतत पाठपुरवा केला. यासाठी ३०४.७१ लाख पयांचा मागणी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी शासनाकडे सादर केला. याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
--
चौकट
--
या निधीतून पंचायत समिती मधिल सर्व विभागांमध्ये फर्निचर, अंतर्गत विद्युतीकरण, संरक्षक भिंत व गेट, अंतर्गत रस्ते, वाहनतळ, बगिचा यांचा समावेश आहे. हे काम एक वर्षात पूर्ण करण्याची मदत देण्यात आली आहे. पंचायत समितीची इमारत दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामूळे झाली व या नविन कामालाही त्याच्यामुळेच निधी मिळाला आहे. या कामामुळे लवकरच आंबेगाव पंचायत समितीची इमारत अद्यावत होईल असे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
-- 30042021-ॅँङ्म-ि02 - आंबेगाव पंचायत समिती इमारत