वीजचोरांकडून ३ कोटी ४२ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:42+5:302021-09-17T04:14:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या ऑगस्टनंतर पुन्हा या महिन्यात एकाच दिवशी पुणे प्रादेशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत महावितरणने ...

3 crore 42 lakhs recovered from power thieves | वीजचोरांकडून ३ कोटी ४२ लाखांची वसुली

वीजचोरांकडून ३ कोटी ४२ लाखांची वसुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या ऑगस्टनंतर पुन्हा या महिन्यात एकाच दिवशी पुणे प्रादेशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत महावितरणने २ हजार २३७ ठिकाणी वीजचोऱ्या व विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे. तसेच नियमाप्रमाणे दंड व चोरीच्या वीजवापरासह सुमारे ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या वीजबिलांची वसुली केली आहे.

पुणे प्रादेशिक विभागात वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे. बिलांचा भरणा न करणाऱ्या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींच्या १८ हजार ३७ वीजजोडण्यांची तपासणी केली. यातल्या २२३७ ठिकाणी वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला. या मोहिमेत सुमारे २० लाख ६६ हजार युनिटची वीजचोरी झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळल्याने त्याच्या वसुलीसाठी सुमारे ३ कोटी १८ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल संबंधीत ग्राहकांना देण्यात आले. त्याचा भरणा न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.

Web Title: 3 crore 42 lakhs recovered from power thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.