पुणे: येरवडामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू; १० कामगार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 12:14 AM2022-02-04T00:14:57+5:302022-02-04T00:15:23+5:30
वाडिया बंगला गेट नंबर ८ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते.
पुणे: येरवडा येथील शास्त्रीनगर येथील गल्ली क्रमांक ८ येथील एका इमारतीचा लोखंडी सांगडा बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला असून त्यात किमान ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
शास्त्रीनगर चौक, वाडिया बंगला गेट नंबर ८ येथील नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु होते. रात्री ११ वाजता हा सांगाडा अचानक कोसळला. त्याखाली तेथे काम करीत असलेल्या जवळपास १० कामगार खाली दबले गेले. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रुग्णवाहिका, १०८ च्या १० रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले. हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की त्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर करुन हा सांगाडा कापला व त्यानंतर खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथून १० कामगारांना बाहेर काढून ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
An under-construction building collapsed in the Yerwada Shastri Nagar area of Pune. At least 3 people have died, many feared trapped, the fire brigade has reached the spot: Pune Fire Brigade
— ANI (@ANI) February 3, 2022
Further details awaited
पुणे: येरवडा, शास्त्रीनगर लेन क्रमांक ८ वाडिया काँलेजजवळ बिल्डिंग कोसळली; तीन मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले बाहेर. #Punehttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/bet02fWArq
— Lokmat (@lokmat) February 3, 2022