पुणे शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:12 AM2024-01-19T09:12:14+5:302024-01-19T09:12:30+5:30
तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ३ लाख २५ हजार ५६१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे...
पुणे : शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नुकत्याच झालेल्या काही घटनांमधून समोर आले आहे. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ३ लाख २५ हजार ५६१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पहिल्या फिर्यादीनुसार पिंपरी परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय इसमाने पोलिसांना तक्रार दिली. त्याच्या मालकीच्या वाइन शॉपचे शटर उचकटून वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या १ लाख ७८० रुपये किमतीच्या दारूच्या बॉटल चोरी गेल्याची आशिष किशोर सोनावणे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे.
दुसऱ्या फिर्यादीमध्ये, वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या मदन विठ्ठलदास राठी (वय ५८) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे क्लिनिकचे शटर उचकटून आत प्रवेश करत २ लाख ५ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तिसऱ्या फिर्यादमध्ये मांजरी येथे राहणाऱ्या अतुल अशोक घुले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्या हॉटेलचे शटर उचकटून आत प्रवेश करत १६ हजार ८८१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.