पाषाण येथे परप्रांतीयांकडून ३ गावठी कट्टे, १८ काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:49 PM2018-08-22T16:49:23+5:302018-08-22T16:51:16+5:30
गावठी कट्टे आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीयांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून पकडले़.
पुणे : गावठी कट्टे आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीयांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून पकडले़. त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे आणि १८ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे़.
नरेंद्रकुमार मिहिलाल राजपूत (वय २५) आणि योगेंद्रसिंग बाबुलाल राजपूत (वय २५, दोघे रा़ मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत़.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांना दोघे जण पाषाण येथील लिंक रोडवर गावठी कट्टे व काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली़. त्यावरुन पोलिसांनी लिंक रोडवरील वैजनाथ टी हाऊस या दुकानासमोर सापळा रचला़. तेथे आलेल्या दोघांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे ३ कट्टे व १८ काडतुसे मिळाली़. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे व त्यांचे सहकारी अविनाश शिंदे, महेंद्र पवार, राजू पाटील, प्रफुल्ल साबळे, शिवाजी राहिगुडे, सचिन चंदन, विठ्ठल खिलारे, राहुल जोशी यांनी ही कामगिरी केली़.