सराईत गुन्हेगाराकडून ३ पिस्तुले, ३ काडतुस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:58+5:302020-12-22T04:10:58+5:30
पुणे : समर्थ पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्यांच्याकडून ३ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. आकाश भगवान ...
पुणे : समर्थ पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्यांच्याकडून ३ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे.
आकाश भगवान त्रिभुवन (वय २५, रा. राधा चौक, बालेवाडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे ३ गुन्हे दाखल आहेत.
समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते व त्यांचे सहकारी हवालदार संतोष काळे, पोलीस शिपाई हेमंत पेरणे, बाळासाहेब पाटोळे, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, शुभम देसाई, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सचिन पवार, निलेश साबळे, सुमित खुट्टे यांचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना सराईत गुन्हेगार आकाश त्रिभुवन हा बारणे रोडवर थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले होते.
अधिक तपासात त्याच्याकडे आणखी २ पिस्तुले व २ काडतुसे मिळाली. या प्रकरणात त्याच्याकडून एकूण ३ पिस्तुले व ३ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते व तपास पथकातील कर्मचाºयांनी ही कामगिरी केली.