सराईत गुन्हेगारांकडून 3 पिस्तुले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:27 PM2018-05-27T22:27:13+5:302018-05-27T22:27:13+5:30
लष्कर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने दोघा सराईत गुन्हेगारांकडून ३ पिस्तूल व १४ जिवंत काडतुसे जप्त केली. ध्रुवबाळ वेडू सुरासे (वय ३६, रा. आडसुरेगाव, ता. येवला, जि. नाशिक) आणि संतोष काशिनाथ सोनवणे (वय ४२, रा. फकीराबादवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत.
पुणे : लष्कर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने दोघा सराईत गुन्हेगारांकडून ३ पिस्तूल व १४ जिवंत काडतुसे जप्त केली. ध्रुवबाळ वेडू सुरासे (वय ३६, रा. आडसुरेगाव, ता. येवला, जि. नाशिक) आणि संतोष काशिनाथ सोनवणे (वय ४२, रा. फकीराबादवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कॅम्प परिसरात तपास पथक गस्त घालत असताना हवालदार शैलेश जगताप यांना जे जे गॉर्डन येथे दोघे जण कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खात्री केल्यावर पोलिसांनी दोघांना छापा घालून पकडले. त्यांच्याकडून ३ देशी पिस्टल व १४ जिवंत काडतुसे असा १ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ध्रुवबाळ सुरासे या सेनादलात नोकरीला होता. त्याला २००९ मध्ये सेनादलातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध येवला पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये गुन्हा दाखल असून त्याच्याकडून ५ देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते. तो सराईत गुन्हेगार असून पुणे शहरात आणखी कोणाला पिस्तूल विक्री केली आहे, याचा तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे, सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे, हवालदार शैलेश जगताप, गणपत थिकोळे, प्रदीप शितोळे, अमोल शिंदे, अमोल राऊत, पवन भोसले, राहुल शिंगे, सागर हुवाळे, आबासाहेब धावडे यांनी ही कामगिरी केली.