शहरात शुक्रवारी नवे ३ हजार ५९४ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:18+5:302021-03-27T04:12:18+5:30
पुणे : कोरोनाबाधितांची शहरात दररोज साडेतीन हजाराच्या आसपास वाढ होत असून, शुक्रवारीही नव्या ३ हजार ५९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली ...
पुणे : कोरोनाबाधितांची शहरात दररोज साडेतीन हजाराच्या आसपास वाढ होत असून, शुक्रवारीही नव्या ३ हजार ५९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे़ महापालिकेच्या सुमारे १ हजार ७५० कोरोना तपासण्यांसह शहरातील विविध प्रयोशाळांमध्ये आज दिवसभरात १६ हजार ७९९ संशयितांची तपासणी करण्यात आली़
तपासणीच्या तुलनेत आजची कोरोनाबाधितांची वाढ ही २१़३९ टक्के इतकी आहे़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २९ हजार ९८३ इतकी झाली आहे़ सध्या शहरात ६१२ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या १ हजार ८८९ इतकी आहे़ गुरूवारच्या तुलनेत आॅक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या आज एकाच दिवसात चारशेने वाढली आहे़
दरम्यान आज दिवसभरात २ हजार १६५ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे़ तर ३१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७ जण हे पुण्याबाहेरील आहेत़
शहरात आजपर्यंत १३ लाख ९९ हजार ५६१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ५१ हजार २२३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख १६ हजार ७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार १६१ इतकी झाली आहे़
==========================