शेतीला ३ टीएमसी पाणी
By admin | Published: March 18, 2016 02:57 AM2016-03-18T02:57:47+5:302016-03-18T02:57:47+5:30
बारामती-इंदापूर तालुक्यांतील दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दोन्ही तालुक्यांच्या बागायती भागातील पिके करपून जाऊ लागली आहेत.
बारामती : बारामती-इंदापूर तालुक्यांतील दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दोन्ही तालुक्यांच्या बागायती भागातील पिके करपून जाऊ लागली आहेत. या पार्श्वभूमीवर, बारामती तालुक्यातील शिवसेना, भाजप व मित्रपक्षांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन शिवतारे यांनी बारामती-इंदापूर तालुक्यांना शेतीसाठी ३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेताला आहे.
बागायती भागातील शेती पाण्याअभावी अडचणीत आली आहे. शेतकरीदेखील नीरा डावा कालव्याचे आवर्तन केव्हा मिळणार, याच्या प्रतीक्षेत होते. यामुळे बाळासाहेब गावडे, मारुतराव वणवे, सत्यवान उभे, बाबासाहेब धुमाळ, राजेंद्र काळे, दिलीप खैरे, राहुल तावरे, राजेंद्र ढवाण, संदीप चोपडे, सुनील शिंदे, यशपाल भोसले, पप्पू मासाळ, माणिक काळे, अॅड. नितीन भामे, बाळासाहेब शिंदे, अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, कुलभूषण कोकरे यांच्या शिष्टमंडळाने शिवतारे यांची भेट घेऊन माहिती दिली. (वार्ताहर)
शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा केली. याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी संपर्क साधून शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.