घरासमोर खेळताना कारच्या चाकाखाली सापडून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू; मांजरी, सिंहगड रस्त्यावरही अपघाताच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:25 IST2025-03-31T13:24:55+5:302025-03-31T13:25:10+5:30

मांजरी, सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे झालेल्या अपघातात तरुण आणि ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

3-year-old boy dies after being hit by car while playing in front of house Accidents on Manjari, Sinhagad roads | घरासमोर खेळताना कारच्या चाकाखाली सापडून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू; मांजरी, सिंहगड रस्त्यावरही अपघाताच्या घटना

घरासमोर खेळताना कारच्या चाकाखाली सापडून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू; मांजरी, सिंहगड रस्त्यावरही अपघाताच्या घटना

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तीन वर्षांच्या बालकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मांजरी, सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी, तसेच नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.

हडपसर भागातील मांजरी भागात घरासमोर खेळणारा तीन वर्षांचा मुलगा कारच्या चाकाखाली सापडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. विष्णू अमरीश जाधव (३) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अमरीश हनुमंता जाधव (२२, रा. विक्रम वाईन्सशेजारील गल्ली, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कारचालक पिंटू भवरलाल माली (३३, रा. घुलेनगर, मांजरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांचा तीन वर्षांचा मुलगा विष्णू २८ मार्च रोजी दुपारी घरासमोर खेळत होता. त्या वेळी कारच्या धडकेत विष्णू गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या विष्णूचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक अनिल बिनवडे पुढील तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागात डंपरच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. देवानंद सुरेश मरगुत्ती (२६, रा. गणपतीनगर, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डम्पर चालक संदीप सूर्यभान धनवटे (३३, रा. यशोदीप बिल्डिंग, किरकवाडी, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत देवानंद यांचा भाऊ सचिन सुरेश मरगत्ती यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२८ मार्च रोजी किरकटवाडी परिसरातील स्वागत हाॅटेलसमोर डम्पर चालक धनवटेने डम्पर लावला होता. डम्परपासून काही अंतरावर देवानंद झोपला होता. रात्री दहाच्या सुमारास धनवटेने डम्पर सुरू केला. डम्परजवळ झाेपलेल्या देवानंद चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक यादव पुढील तपास करत आहेत.

नगर रस्त्यावरील येरवडा परिसरात रस्ता ओलांडणारी ज्येष्ठ महिला वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. २१ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. अमीना करीम मेघानी (६०, रा. विलमिन सोसायटी, आगाखान पॅलेससमोर, शास्त्रीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मेघानी यांची मुलगी अमरीन (२८) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी अमीना रात्री दहाच्या सुमारास शास्त्रीनगर परिसरातून निघाल्या होत्या. नगर रस्त्यावरील श्री हाॅस्पिटलसमोरून त्या रस्ता ओलांडत हाेत्या. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक लामखेडे पुढील तपास करत आहेत.

Web Title: 3-year-old boy dies after being hit by car while playing in front of house Accidents on Manjari, Sinhagad roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.