फसवणूकप्रकरणी ३ वर्षांची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:42 AM2019-02-27T01:42:57+5:302019-02-27T01:42:59+5:30
सत्र न्यायालयात शिक्षा कायम : आरटीओची बनावट कागदपत्रे तयार केली
पुणे : आरटीओची बनावट कागदपत्रे बनवून मोटारीची चारचाकीची विक्री करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात एका एजंटला सुनावण्यात आलेली तीन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयातही कायम ठेवली. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने हा निकाल कायम केला आहे़
अकबर अली सोमी (वय ५० रा. नाना पेठ) असे आरोपीचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. पी. बावस्कर यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये अकबर सोमी याला शिक्षा सुनावली होती़ या निकालाच्या विरोधात सोमी याने सत्र न्यायालयात अपील केले होते़ या अपिलाच्या सुनावणीचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले.
गाडीचा फॉर्म नंबर २८ स्वत:च्या हस्ताक्षरात तयार केला. त्यावर आरटीओचा शिक्का आणि सहीचा स्टँप मारला. तसेच कोल्हापूर आरटीओकडे गाडी ट्रान्सफर झाल्याचा फॉर्म दाखल केला. गाडीचे मूळ मालक सचिन पांडुरंग खेडेकर यांची खोटी सही
केली होती़
या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वावस्कर यांनी आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी आणि १,३०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्या न्यायालयात हे अपील आरोपीने दाखल केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल सत्र न्यायालयाने कायम ठेवला. या अपिलाच्या सुनावणीचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले.
पाच गाड्यांची कागदपत्रे दिली विक्रीला
अल्ताफ पीर महंमद शेख यांनी फिर्याद दाखल केली होती. शेख यांचा नमस्कार मोटर्स नावाचा चारचाकी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे़ सोमी आणि निसार जामदार यांचा चारचाकी गाड्यांची खरेदी-विक्री एजंट होते. त्यांनी जमादार यांच्याकडील पाच गाड्यांची कागदपत्रे सोमी याला विक्रीसाठी दिली होती. त्याने त्यातील एका गाडीची बनावट कागदपत्रे तयार केली. त्याने ही गाडी कोल्हापूर येथील सुभाष शंकर रणभारे यांना विकली. त्याने ही गाडी विकताना पुणे आरटीओची बनावट कागदपत्रे तयार केली.