पिंपरी पेंढार येथे आढळले ३० कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:22+5:302021-04-19T04:09:22+5:30
जुन्नर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोविड-१९ नियंत्रणासाठी, तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाय योजना ...
जुन्नर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोविड-१९ नियंत्रणासाठी, तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माझे कुटुंब - माझी जबाबदारी कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात आलेली आहे. प्रत्येकाच्या घरी होम टू होम जाऊन सर्वेक्षण करून तपासणी करण्यात येत आहे. शनिवार केलेल्या अँटीजन तपासणीत ७५ संशयितांपैकी १६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्णांना लेण्याद्री कोविड केअर सेंटर व खासगी दवाखाना येथे भरती करण्यात आले.
सरपंच सुरेखा वेठेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी तपासणी सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत मार्गदर्शन केले आहे. सदर मोहिमेत आळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण जाधव, डॉक्टर आरती गीते, डॉ. अशोक त्रिभुवन, आरोग्य सेवक जगदीश ताजवे, आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक जंजाळ, कर्मचारी यांनी उत्कृष्टरीत्या नियोजन करून जबाबदारी पूर्वक कामकाज पार पाडले.
१८ आळेफाटा
पिंपरी पेंढार प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर तपासणीसाठी लागलेली रांग.