डीपीवरील हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत

By admin | Published: March 18, 2017 05:00 AM2017-03-18T05:00:26+5:302017-03-18T05:00:26+5:30

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर हरकती घेण्यासाठी राज्य सरकारने ३० दिवसांची मुदत जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने तयार केलेला हा आराखडा

30 days for the objections on the DP | डीपीवरील हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत

डीपीवरील हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत

Next

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर हरकती घेण्यासाठी राज्य सरकारने ३० दिवसांची मुदत जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने तयार केलेला हा आराखडा जाहीर करताना त्यात १० टक्क्यांपेक्षा जास्त बदल करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या आराखड्यातील फेरबदलाचे नकाशे नगररचना सहसंचालक व पालिकेच्या संकेतस्थळावर आहेत. सहकारनगर येथील नगररचना सहसंचालक कार्यालयातही हे नकाशे पाहता येतील.

आरक्षणांवर आक्षेप
महापालिका निवडणुकीच्या काही दिवस आधीच राज्य सरकारने शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर केला. ९३७ पैकी ८५० आरक्षणे कायम ठेवली आहेत. शासकीय जागांवरील ८७ आरक्षणे उठविण्यात आली आहेत. त्यावर अनेकांनी आक्षेप घेत काही आरोपही केले होते. आता त्यांना एक महिन्याच्या मुदतीत आपले आक्षेप नोंदवावे लागतील.

Web Title: 30 days for the objections on the DP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.