Pune: व्यवसाय सुरू करून देण्याचे आमिष दाखवून ३० लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: December 27, 2023 05:29 PM2023-12-27T17:29:48+5:302023-12-27T17:31:48+5:30
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे आरोपी गौतम शिवाजी मोरे (रा. कल्याण) याने फिर्यादींचा विश्वास संपादन करून व्यवसाय सुरु करून देण्याचे आश्वासन दिले. व्यवसायातून चांगला फायदा मिळेल असे आमिष दाखवले....
पुणे : व्यवसाय सुरु करून देतो सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने मंगळवारी (दि. २६) कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२१ ते ७ जून २०२२ यादरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे आरोपी गौतम शिवाजी मोरे (रा. कल्याण) याने फिर्यादींचा विश्वास संपादन करून व्यवसाय सुरु करून देण्याचे आश्वासन दिले. व्यवसायातून चांगला फायदा मिळेल असे आमिष दाखवले.
फिर्यादींनी व्यवसाय सुरु करण्यास होकार दिल्यावर आरोपी गौतमने वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादींना पैश्यांची मागणी केली. फिर्यादींकडून एकूण ३० लाख रुपये उकळले. पैसे गघेउनही व्यवसाय सुरु करून दिला नाही म्हणून फिर्यादींनी गौतमकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादींनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत जबाब नोंदवला.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गौतम विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात हे करत आहेत.