उच्च शिक्षणासाठी तरुणांना ३० लाखांची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:41+5:302021-03-10T04:10:41+5:30
पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने विविध कंपन्यात नोकरी करणाऱ्या तरुणांना उच्च शिक्षणासाठी घेण्यासाठी ३० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार ...
पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने विविध कंपन्यात नोकरी करणाऱ्या तरुणांना उच्च शिक्षणासाठी घेण्यासाठी ३० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अर्धवेळ अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले की, विविध कंपन्यांकडून इच्छुक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मंगळवारी (दि.९) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. संस्थेच्या अधिष्ठाता नूतन जाधव, शांतीलाल हजेरी आदी यावेळी उपस्थित होते.
“आर्थिक परिस्थितीमुळे पदवीचे शिक्षण झाले की अनेक तरुण उच्च शिक्षण न घेता नोकरीच्या मागे लागतात. अशा होतकरू तरुणांना पदव्युत्तर शिक्षणाची संधी आम्ही मिळवून देणार आहोत. केवळ आर्थिक अडचण असल्याने शिक्षण थांबू नये, हा यामागील उद्देश आहे. नोकरदार, छोटे व्यावसायिक यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रोत्साहन देणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.