केडगाव येथे वाळू चोरीप्रकरणी तीस लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:09+5:302021-04-06T04:10:09+5:30
सोमवारी पहाटे ही कारवाई केली. याप्रकरणी अमोल चौधरी, निखिल माणिक मगर ( दोघेही रा. नायगाव, ता. हवेली), राजेंद्र गायकवाड ...
सोमवारी पहाटे ही कारवाई केली. याप्रकरणी अमोल चौधरी, निखिल माणिक मगर ( दोघेही रा. नायगाव, ता. हवेली), राजेंद्र गायकवाड (रा. हडपसर, पुणे), अजिंक्य भाऊसाहेब शेळके व आशिष शेळके ( दोघे रा. केडगाव ) इतर तिघे जण ट्रकचालक व एक जेसीबी चालक(नाव माहीत नाहीत) अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
यवत पोलिसांना केडगाव येथील मुळा-मुठा कालव्यालगत सोमवारी पहाटेच्या सुमारास वाळूचोरी होत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवले. पोलिसांनी या ठिकाणी तीन ट्रक, एक जेसीबी व १२ ब्रास वाळू जप्त केली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा व सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्यानुसार संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल झाले आहेत.या आरोपीवर यापूर्वीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
०५ केडगाव
यवत पोलिसांनी जप्त केला वाळूचा ट्रक.