पुण्यात गावठी दारुसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ संशयित आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 01:14 PM2023-05-13T13:14:24+5:302023-05-13T13:14:32+5:30
पुणे जिल्ह्यातील हाथभट्टीनिर्मिती, साठवणूक, विक्री यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागा मोहीम सुरु
पुणे : बेकायदा हातभट्टी दारूची विक्री व निर्मितीविरोधात मोहीम राबवून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ३० लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या वेळी ८४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ३२ जणांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यासाठी विभागाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. रमेश चव्हाण (४१, रा. येरवडा) याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्कचे संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार उपायुक्त मोहन वर्दे, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे यांच्या पथकांनी कारवाई केली. जिल्ह्यातील हाथभट्टीनिर्मिती, साठवणूक, विक्री यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.