जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुणे विद्यापीठात ३० संघटनांकडून निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 08:55 PM2020-01-06T20:55:52+5:302020-01-06T20:57:04+5:30

या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांकडून एकमेकांवर आरोप

30 organizations protest against JNU attack incident at Pune University | जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुणे विद्यापीठात ३० संघटनांकडून निषेध 

जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुणे विद्यापीठात ३० संघटनांकडून निषेध 

googlenewsNext
ठळक मुद्देआज पुण्यात विविध ठिकाणी जेएनयु घटनेचा निषेध

पुणे : जेएनयुमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निषेध करण्यात आला. विविध विद्यार्थी संघटना एकत्र येत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. एनएसयुआय सोबत 30 विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

रविवारी रात्री जेएनयु मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. साठहुन अधिक गुंड चेहरा झाकून विद्यापीठात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पंधराहून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांकडून एकमेकांवर आरोप केले.

या घटनेचा देशभरात निषेध करण्यात येत आहे. आज पुण्यात विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संध्याकाळी 7 च्या सुमारास निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो विद्यार्थी विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन जवळ जमले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा यावेळी दिल्या. तसेच केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: 30 organizations protest against JNU attack incident at Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.