शेळगाव येथील ३० वर्षांचा रस्त्याचा वाद अवघ्या एक तासात मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:45+5:302021-09-10T04:16:45+5:30
वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ३८ गावे आहेत. बुधवारी (दि. ९) वालचंदनगर पोलीस स्टेशन तर्फे तक्रार निवारण दिन ...
वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ३८ गावे आहेत. बुधवारी (दि. ९) वालचंदनगर पोलीस स्टेशन तर्फे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ३० वर्षांचा रस्त्याचा वाद अवघ्या १ तासात मिटवण्यात आला. सदर चारस्ता दक्षिण उत्तर ७०० मीटर असून तो पूर्णपणे मोजून देऊन १९९२ पासून नंदा वायसे शेळगाव ( वायसे वस्ती ) यांनी अर्ज वालचंद नगर पोलीस स्टेशनला दिला असता तो वाद अवघ्या १ तासात मिटविला. यामध्ये नंदा वायसे विरुद्ध दिलीप वायसे, अर्जुन वायसे, आशोक वायसे, नामदेव वायसे हे सर्वजण एकाच घरातील भाऊ बंद असून ते १९९२ पासून अलिप्त झाले होते त्यामुळे रस्त्याची अडचण वारंवार भासत होती. भांडण तंटा होत होता तो वाद तक्रार निवारण दिनादिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, वालचंनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातूरे, पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर,अतुल खंदारे,नितीन लकडे यांचे समोर दोघांना उभा करून समझोता करण्यात आला.