...३० वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग

By admin | Published: November 8, 2016 01:09 AM2016-11-08T01:09:39+5:302016-11-08T01:09:39+5:30

श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर येथील १९८६च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र आले. त्या वेळी शिकवत असलेल्या गुरुजनांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

... 30 years later, the Class 10 class again filled | ...३० वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग

...३० वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग

Next

काटेवाडी : श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर येथील १९८६च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र आले. त्या वेळी शिकवत असलेल्या गुरुजनांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
सन १९८६ ला इयत्ता दहावीची परीक्षा देऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या बालमित्रांची भेट होत नव्हती. ठराविक मित्र सुसंवाद साधत होते, या संवादातून स्नेह मेळाव्याची कल्पना पुढे आली. संवादातून मेळाव्याची तारीख ठरली. संजय पवार, वसंतराव जगताप, अविनाश मोटे, परशुराम रायते, सुधाकर झगडे, नामदेव पवार, दतात्रय गिरी, संगीता गवळी, सुशीला खांडेकर, भारती काळे आदींनी पुढाकार घेतला. सकाळी दहा वाजता शिपाई गावडे यांनी घंटा दिली. त्यानंतर पुन्हा ३० वर्षांनी शाळा भरली. तत्कालीन पीटी शिक्षक सोनवणे यांनी प्रार्थना घेतली. यानंतर उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व दिवंगत झालेल्या सहकारी मित्र व शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
३० वर्षांनी भेटल्याने ओळख करून देईपर्यंत विद्यार्थी एकमेकांना ओळखू शकले नाही. सुरेश झालटे, सर्जेराव पवार, आर. डी कुलकर्णी, डी. बी मोरे, करंदीकर, रज्जाक मणेरी या शिक्षकांनी संस्काराचे तास घेतले. तसेच उर्वरित आयुष्यात समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जावेत, संस्कार हद्दपार होत आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन शिक्षक मोटे उपस्थित होते.
त्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन करून तीस वर्षांनी सर्वांना एकत्र केले. पुन्हा शालेय आठवणीला उजाळा दिला.
याबद्दल उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित सर्व शिक्षकांचा सन्मान बाळासाहेब शिंदे, अनिल सपकळ, बाळकृष्ण टकले, गणेश सपकळ, दादा पिसे, आशा गायकवाड, प्रतिभा गिरंजे, संगीता भिसे आदींनी केला. सूत्रसंचालन रवींद्र खवळे यांनी केले. यावेळी श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, प्राचार्य एस. बी. थोरात, अप्पा कोळेकर, अशोक निंबाळकर, मासाळ सर, भागवत घुले, काशीनाथ गावडे, दत्तात्रय कोळेकर, देवकरसर उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: ... 30 years later, the Class 10 class again filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.