डिजिटल चोरट्यांकडून ३०० कोटींवर डल्ला , ५७ हजारांवर नागरिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 05:06 AM2018-01-31T05:06:17+5:302018-01-31T05:06:40+5:30
वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला आहे.
-विशाल शिर्के
पुणे : वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला आहे.
ई-अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारकडून चालना देण्यात येत आहे. मात्र, त्या प्रमाणात क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे होणाºया व्यवहारांची सुरक्षितता तितकीशी वाढली नसल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे केंद्रीय माहिती अधिकारी व्ही. जी. शेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत तब्बल ५७ हजार ४११ नागरिकांना फसविण्यात आले. तब्बल २९० कोटी ३४ लाख ७२ हजार रुपये नागरिकांच्या खात्यातून चोरट्यांच्या खिशात गेले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे. स्किमर लावून डेबिट कार्डचे क्लोन करणे, क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून पैसे लांबविणे अशा घटनांचा समावेश आहे.
कार्ड फसवणुकीच्या घटना
ई-व्यवहारांची सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे. आधार जोडणीमुळे खातेदाराच्या बोटांच्या ठशांसह संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. कार्डद्वारे होणाºया व्यवहारांत खातेदाराचे ठसे, तसेच खातेदाराच्या मोबाइल क्रमांकावरील गोपनीय क्रमांक ग्राह्य धरला जावा.
- विजय सागर, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे