जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचायतींसाठी ३०३५ मतदान यंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:22+5:302021-01-08T04:35:22+5:30
पुणे : जिल्ह्यातील साडेसहाशे ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून, २ हजार ६३८ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. ईव्हीएम यंत्राद्वारे ...
पुणे : जिल्ह्यातील साडेसहाशे ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून, २ हजार ६३८ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान होणार असून त्यासाठी ३ हजार ३५ मतदान यंत्रे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावरही मतदान यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत.
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात ९५ ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उमेदवारांना चिन्हवाटप केले असून, जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्र देखील निश्चित केली आहेत. २ हजार ६३८ केंद्रांवर मतदान होणार असून ज्या ठिकाणी प्रभागांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी जादा मतदान यंत्रे उपलब्ध करून दिले आहेत.
सर्वाधिक साडेतीनशे मतदान केंद्र शिरूर तालुक्यात असून, हवेली २७७ ,मावळ २२८, मुळशी १९१, भोर २२२, दौंड २५१, इंदापूर २८२, बारामती २५२, खेड ३२४ आणि जुन्नर तालुक्यात २६१ मतदान केंद्रे आहेत. जिल्हा प्रशासनाने या मतदान केंद्रासाठी आवश्यक मतदान यंत्रे तहसीलदार कार्यालयात उपलब्ध करून दिली आहेत. प्रभाग पद्धतीमध्ये ‘ईव्हीएम’द्वारे मतदान घेतले जाईल. दुबार मतदानासाठी काही प्रमाणात छापील मतपत्रिका देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.