उरळगाव कोविड सेंटरमधून ३०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:08+5:302021-06-02T04:10:08+5:30
उरळगाव (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या ...
उरळगाव (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रयत्नातून राव-लक्ष्मी फाउंडेशन, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व महसूल विभागाच्या वतीने २९ एप्रिलपासून कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. सेंटरमध्ये एकूण ११० बेड आहेत. या कोविड सेंटरमध्ये डॉ. आकाश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीती गवई, सीमा चव्हाण, नीलोफर सय्यद, शिल्पा तायडे आदी आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. या कोविड सेंटरसाठी राव-लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच अनेक दानशूर व्यक्तींकडून वस्तूंच्या तसेच रोख रक्कमेच्या स्वरूपात मदत केली जात आहे.
उरळगाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करताना डॉ. आकाश कोकरे व आरोग्य कर्मचारी.