शहरातील ३१ गुंड तडीपार

By admin | Published: December 11, 2015 12:49 AM2015-12-11T00:49:07+5:302015-12-11T00:49:07+5:30

समाजविघातक प्रवृत्तींना शहरातून हद्दपार करण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यातील नियमानुसार सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्याची मोहीम पोलिसांनी घेतली आहे.

31 hooligans in the city | शहरातील ३१ गुंड तडीपार

शहरातील ३१ गुंड तडीपार

Next

पिंपरी : समाजविघातक प्रवृत्तींना शहरातून हद्दपार करण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यातील नियमानुसार सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्याची मोहीम पोलिसांनी घेतली आहे. या वर्षअखेरीस आतापर्यंत ३१ गुंडांना तडीपार केले आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार काहींना एक, तर काहींना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. याशिवाय वर्षभरासाठी तडीपार केलेल्यांमध्ये आणखी १७ गुंडांचा समावेश आहे.
या तडीपार गुंडांमध्ये पिंपरीतून यासीन ऊर्फ राजू पठाण (कालावधी १ वर्ष), नवाब शेख, संदीप वाघमारे,चंद्रशेखर पाटील,जालिंदर निकम या आरोपींना प्रत्येकी २ वर्षांसाठी, निगडीतून बॉबी ऊर्फ सुरेश यादव, विवेक ऊर्फ सोन्या काळभोर यांना दोन वर्षांसाठी, तर सागर सावंत याला १ वर्षासाठी, हिंजवडीतून गणेश बारणे, रवी भिलारे, उमेश वाघुलकर,आशिष मिसाळ याना दोन वर्षांसाठी, तर कुदरत खान, पिंट्या ऊर्फ रवींद्र दगडे यांना एका वर्षासाठी, चिंचवडमधून इरफान शेख, अविनाश पवार, रफिक शेख, आकाश काळे यांच्यावर दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. भोसरीतून शिवदास गायकवाड (दोन वर्षे), तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संतोष ऊर्फ लाल्या जाधव, समाधान मोरे, नितीन वाघमारे, बबलू वाघमारे यांच्यावर १ वर्षासाठी; वाकड येथील प्रशांत पननसिंह ठाकुर याला एका वर्षासाठी तर विक्की पोटे याला २ वर्षांसाठी, सांगवीतील नितीन गायकवाडला दोन वर्षे, तर गणेश ढमालेला १ वर्षासाठी, चतु:शृंगीतून दत्ता अलकुंटे व प्रमोद ऊर्फ भूषण यमकर या दोघांना एका वर्षासाठी तडीपार केले.
दरम्यान, मागील वर्षी तडीपार केलेल्या गुंडांमध्ये पिंपरीतील सलीम पटेल,किरण रणदिवे, समीर शेख, प्रकाश साळसकर, अतुल पवार, अनिल पिवल, विजय सौदे,आकाश हजारे,जुनेद खान यांचा समावेश आहे. हिंजवडीमधील संतोष खलसे, शंकर खडसे, विनोद बारणे,सचिन कोळेकर; सांगवीतील तुषार सोनवणे, राजा मंजाळ, निखिल कदम, तर भोसरीतील नीलेश कोळी या गुन्हेगारांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
> शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहनांची तोडफोड करणे, दगडफेक करणे अशी दहशत माजविण्याची कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली जात आहे. कोम्बिंग आॅपरेशनद्वारे झोपडपट्टीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली जात आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्यांना तडीपार केले जात आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.
- डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन

Web Title: 31 hooligans in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.